लेखमाला मोती 10
🌹🙏🏻
🍀यशस्वी आयुर्वेदिक
प्रँक्टिसची गुरुकिल्ली🍀
💫प्रत्येक वैद्याने स्वतःचे
१)सुंदर क्लिनिक
२)पंचकर्म सेटअप
३)स्वतःची फार्मसी
४)थोडीशी का होईना शेती
५)स्वतःचे आयुर्वेदीय दुकान
आणि
६)या सर्वांचे पोषण करणारे
उत्तम ग्रंथालय,या 6 गोष्टींची
बीजे वैदयकीय व्यवसाय सुरू
करतानाच पेरायची असतात.
🍁ध्येय ठेवायला पैसे लागत
नाहीत ; ध्येयाचा पाठलाग
सुरू झाला की,
🍁अभ्यास वाढतो ,
🍁 द्रव्यांचा अभ्यास होत जातो,
🍁इतरांच्या औषधांची गुणवत्ता
समजते .
🍁खर्च कमी केले जातात,
🍁बचतीचे महत्त्व कळते,
🍁गरजा कमी केल्या जातात,
🍁मिळालेले धन व्यवसायात
वापरले जाते,
🍁 दवाखान्यात बसून खुर्ची
उबवण्याचे महत्व कळते,
🍁यशस्वी लोकांच्या साधनांचा
अभ्यास घडतो,
🍁त्यांचे मोलाचे सल्ले
मिळतात,
🍁बोलण्या वागण्यातील मस्ती
कमी होवून स्वभावाला रुजुता
येते,
🍁वरील 6 पैकी एक एक गोष्ट
मिळत जाते,
🍁स्वतःची औषधे वापरात
असल्याने चिकित्सेत
आत्मविश्वास वाढत जातो,
🍁आपल्या मुळे अनेकांच्या
घरामध्ये चुली पेटू लागतात,
🍁वैद्याने,वैद्य आणि
परिचारक दोघांचे गुण
अंगिकारनेे केव्हाही फायद्याचे
आहे.
🍁"सगळं आपणच का
करायचं?" असा प्रश्न
पडणार्यांसाठी हे लिखाण
नाहीये.
🍁वरील 6 गोष्टिंमधील जे उत्तम
वाढीला लागेल आणि ज्यात
आपल्याला गती आहे ते पुढे
आणखी वाढविता येते,
🍁वयोमानानुसार हे सर्व
दुसऱ्यावर सोपवायचं आहे
किंवा कमीकमी करत न्यायचं
आहे ; त्याचं ही नियोजन
आधीच करून ठेवणे गरजेचे
आहे,
🍁यासाठी वैद्याने आपली
साधना एकीकडे वाढवीत नेणे
योग्य ठरते,
🍁याने चारही पुरुषार्थ
मिळण्याची शक्यता चांगल्या
प्रकारे वाढते असे दिसते.
®️ वैद्य.समीर जमदग्नी सर
©️CVARC.
🌹🙏🏻
Thankyou sir
Comments
Post a Comment