लेखमाला मोती- 9
🌹🙏🏻
*🔴रूग्ण तपासणी , निदान चिकित्सा व औषधीद्रव्यांची निवड🔴*
🍁रुग्ण परीक्षण हे नेहमी शरीराच्या बाहेर आत आणि औषध शोधणे हे नेहमी शरीराच्या आतून बाहेर व्हावे ,म्हणजे छान यश येते,"दर्शन स्पर्शन,प्रश्नन या मद्धे ही हाच विचार दिसतो.
🍁 पडवीच्या वर सोप्यावर बसलेले जुने वैद्य अंगणातून चालत येणाऱ्या रुग्णाच्या चाल, मुद्रा, देह बोली वरून निदान करीत असत ( स्पॉट डायग्नोसिस) त्या नंतर रुग्ण बोलू लागला की कोणता शब्द ( स्वर,व्यंजने) किती आणि कशी बोलतो यावरून कोणत्या चक्रामद्धे विकृती असावी याचा विचार करून रुग्णाचा प्रधान विकृत अवयव ही ठरवत असत( याला अनुभव आणि अभ्यासाची निरंतर जोड हवी फक्त खुर्चीत आणि ए सी त न उठता बसून राहून हे अवघड आहे,) हे जमले तर साम वेदोक्त गोष्टींचा आणि मंत्र चिकित्सेचा वापरही रुग्णावर करता येऊ शकतो.
🍁गुडघे ,सांधे, उदर ,शिर आदींची स्पर्श करून तपासणी करताना तेथील रचनेचे उष्णता मान ,रंग ,हलवून कोणत्या रचनेत विकृती आहे ,विकृत वृद्धी क्षयादी आहेत का इत्यादी गोष्टी पाहण्याने हळू हळू शरीराचे आत डोकावता येते जसे..
🍁कंडरे मद्धे विकृती वेदना आदी आढळल्यास रक्त धातू, यकृत,ग्रहणी ,आमाशयातील रंजक पित्त, रक्त कीटं पासून बनलेल्या उंडुकादि पक्वाशयस्थ अवयवांचे व्याधी चिकित्सेेच्या वेळी लक्षात घ्यावेत,या मद्धे वातज पांडू,पूर्वी होऊन गेलेली कामला,रक्तदुष्टी,मज्जाबिघडविणारे हेतू,पुरीष विबंध इत्यादी गोष्टी चटकन लक्षात येतात आणि त्या नुसार चिकित्सा योजना करता येते, या गोष्टी लिहिता वाचताना वेळ लागत असलातरी प्रत्यक्षात एखादया प्रतिक्षिप्त क्रिये सारख्या घडून येऊन पुढील प्रश्नन परीक्षा टू दि पॉईंट होऊन औषधेही येऊ लागतात.
🍁याच प्रकारे अवयवांचे रंग ,उष्णता ,शीतता,स्नायू,शिरा,अस्थि, संधी,पुढील भाग मागील भाग,मांसपेशी,इत्यादी गोष्टी निदान आणि चिकित्से साठी महत्वाच्या ठरतात.
🍁सांख्यांचा सृष्टी उत्पत्ती क्रम हा सूक्ष्मापासून स्थूलापर्यंतचा सर्ग आहे, अन्नपचन प्रक्रिया हा स्थूलापासून सुक्ष्माचा विचार आहे तसेच चिकित्सेने बरे करतानाही प्राधान्याने स्थूलापासून सुक्ष्माचाच विचार आहे.
🍁औषधी निवडी मद्धे ,ते द्रव्य कोठे तयार होते,त्याचे काटेरी आदी स्वरूप ( मद्धे गंडीरादयरिष्ट बनवताना त्रिधारी का चार धारी निवडुंग निवडावा? याचा पाठ पुरावा करताना चरक पाहता चरकांनी एका ओळीत खूप महत्त्वाचा तुकडा पाडून टाकल्याचे आढळले,कफ मेद यांचं छेदन भेदन अपेक्षित असताना चिकित्सेचे बॉस चरकाचार्य तीन चार धारा न सांगता निवडुंगाच अल्प कंटक, बहूकंटक असं वर्णन करून बहुकंटकाचा आग्रह धरतात ,ही आयुर्वेदाची बॉटनी आपण कधी लक्षात घेणार? असो) इत्यादी गोष्टी लक्षा्त घेऊन मगच त्याचे द्रव्य गुण कर्म आदी लक्षात घेऊन चिकित्सा करावी.
🍁याने अभ्यास ही वाढीस लागतो, एकच द्रव्य अंतर्बाह्य ,नेत्रात कानात,लेपात ,बस्तीत आदी ठिकाणी घातल्यास काय कार्य घडते याचे द्रव्य गुण शास्त्र तयार होऊ लागते ,आणि याचीच ग्रंथ वाचताना फार गरज पडते.
🍁वैद्याने गोड बोलून ,रागावून, रुग्णाने यम, नियम, प्राणायाम, आसने करून पडणारा गुण हा ही वरील विवेचनाने सिद्ध होतो.
🍁 रुग्णाच्या व्याधीग्रस्त अवयवाचे "शारिर" आणि निवडलेल्या द्रव्याचेही "शारीर" लक्षात घेतल्यास चिकित्सा गुण आणि आनंद देऊन जाते.
🍁 आयुर्वेदीय निदान करून एखादे छान औषध निघाल्यास असं लक्षात येत की त्या योगाच्या फलश्रुतीतील काही लक्षणे रुग्णास विचारल्यास रुग्ण सांगतो की " हा त्रास आहे म्हणून तर तुमच्या कडे आलोय "आणखी उरलेली लक्षणे विचारल्यास तो म्हणतो की " हे प्रकार मला पूर्वी व्हायचे" आणखी खोदून पुन्हा उरलेली लक्षण विचारल्यास रुग्ण सांगतो की " हे त्रास मला कधीच झालेले नाहीत" जर रुग्णाने चिकित्सा न घेता अपथ्य सेवन केले तर ही त्याला नसलेली लक्षणेही भविष्यात उत्पन्न होतात असे दिसते.
🍁आयुर्वेद हा एकदा निदान झाले की रुग्णाच्या भूत वर्तमान भविष्याचीच ट्रीटमेंट करतो ,या नुसार रुग्णाला" त्याचे आरोग्यभविष्य ही सांगता येते "
ज्योतिर्वैध्यो निरंतरम" चा असाही अनुभव येऊ शकतो.
🍁 अग्निमुलं बलम पुसाम ,रोगह् सर्वेपिं मंदेगनौ, ही सूत्रे तर महत्वाची आहेतच त्या मुळे प्रत्येक आजारात कोष्टस्थ लक्षणे तर असणारच आहेत ,त्याच्यां कडे केव्हा कस आणि कश्याच्या हिशेबाने जायचं हे जे आता पर्यंत जाणवले त्यासाठी हा लेखन प्रपंच केला.
🍁शरीर आत्म्यासह असताना "समयोगवाहित्व" दाखविते सबब वैद्याने द्रव्याची योग्य निवड शक्य तितकी बुद्धी लावून करावी पण खूप खिस पाडून हा गुण तो गुण ,मग याच कस करायच ,ते असं म्हणतात असे खूप टोकाचे विचार केल्याने चिकित्साच करायला येणार नाही ,शरीराच्या समयोगवाहित्वाचा ,विपरीत गुणेछेचा ही आपण उपयोग करून घ्यायला हवा.
🍁जे आत आलंय ते कोणत्या गुणाच आहे आणि त्याच कार्य कस करून घ्यायचं हे वैद्या इतकं शरीराला ही ,(आजारी शरीर मनाला तर जास्तच) समजत ,शरीरातील हरी(आत्माराम) ते पाहून घेत असतो अन्यथा चिकित्साच अवघड होऊन बसत.
🍁 काही वैद्यांच्या मतानुसार "पूर्व कर्मा पासून प्रधान कर्मा पर्यंत असा एक तरी "अर्ह" रुग्ण तू मला काढून दाखव की ज्याला पंचकर्म करता येइल" आणि खरच तसा निघतही नाही कुठे तरी तो अयोग्य होतोच ,तसच " दुष्यंम देशम च ही आहे ,तरीही ग्रंथकार हे करायला सांगतात तेव्हा शरीराचा वरील गुणच त्यांनी लक्षात घेतलेला असतो आणि आदर्श गोष्ट काय आहे हे तर शास्त्रात लिहिले गेलेच पाहिजे.
🍁 तसेच चरक आदी पेक्षा इतर कोणी वैद्य श्रेष्ठ नाही हेही खरेच आहे,तरीही वरील विचाराने वागणूक ठेवल्यास समयोग बऱ्यापैकी साधतो असं वाटले म्हणून आणि आतून उत्स्फूर्तपणे आले म्हणून लिहून काढले.
®️वैद्य.समीर जमदग्नी सर
©️श्री विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय व रिसर्च सेंटर, कोल्हापूर
🌹🙏🏻
Thankyou sir
Comments
Post a Comment