लेखमाला मोती 8

🌹🙏कोजागिरी पौर्णिमेचे दम्याचे औषध देणे हि भारतामद्धे अनेक ठिकाणची परम्परा आहे .
यासाठी निरनिराळे औषधी योग देश काल प्रकृती परत्वे वापरले जातात , 
निरनिराळ्या भाषा मधील औषधी बाडात हे पाठ वाचनात येतात . त्यात प्रामुख्याने 
1) बांबूच्या पानांचा रस किंवा कल्क ( इतर वेळे पेक्षा या कालावधीत पहाटे / रात्री हा रस बरा निघतो आणि वीर्यवान असतो .)( चित्रकूट ला ) 
2) काकडशिंगी , पिंपळी ( चित्रकूट आणि दक्षिण भारत )
3) वासा पत्र आणि विड्याचे पान  ( पश्चिम महाराष्ट्र )
4)सुके अंजीर , आणि गोरखचिंच दळ ( मध्य प्रदेशात )
5) सितोपलादी चूर्ण आणि ओली हळद चूर्ण 
6) कोष्ठ , त्रिकटू , यष्टी 
7) पुष्कर मूळ , पिंपळी , वंशलोचन किंवा सुरसा बीज 
8) सोमलता चूर्ण. तालिसादी चूर्ण आणि यवक्षार , अर्क क्षीरात भाजलेली हळद ( राजस्थान प्रांत )
असे घटक असलेले कल्प वापरले जाताना दिसतात .
कोजागिरीचं med प्राधान्याने संतमक श्वासासाठी उपयोगी आहे .
गाईच्या दुधाने / खिरीने गामित्वाचा विचार वापरून त्यासह कफ कमी करणारी औषधे वापरून दमा कमी करायचा असे तत्व यात प्राधान्याने वापरले जाते .
दूध आहारीय द्रव्य असल्याने रसाने कार्य करते ते कॅरिअर म्हणून वापरले जाते आमाशय आणि तिथून फुफ्फुसांत ते औषधांना कफ वाढवीत घेऊन जाते तिथे औषधे हि वीर्याने काम करत  असल्याने अनोन्य अभिभव  घडून येऊन रसा पेक्षा वीर्य वरचढ होऊन कफ नष्ट होऊ लागतो .
यासह आणखी दोन घटना घडतात 
एक दुग्घं च मूत्रम् च virechnani नुसार कल्पात मोठ्या प्रमाणांत दूध वापरलेले असल्याने कोठा साफ होतो आणि तमके तू विरेचनम् या सूत्राचा प्रत्यय येतो .
दुसरे या med च्या सेवनाचे वेळी रात्री पूर्ण जागरण आणि दुसरे दिवशी दुपारी न झोपता रात्रीच झोपायचे असल्याने आणि लघु आहार सेवन असल्याने छाती आणि पोटातील कफ कमी होऊन जातो .
साधारण पित्त प्रकोप आणि वाताच्या प्रकोपाच्या काळात हे औषध दिल्याने मानवते देखील चांगले .
दम्यासाठी कोणत्याही पॅथीचे med दिल्या नन्तर मूत्रप्रवृत्तीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढून. दमा कमी होतांना दिसतो , चरक आणि वाग्भटात देखील म्हणूनच

विदारीभि: कदम्बैर्वा तालसस्यैश्च साधितम् |
घृतं पयश्च मूत्रस्य वैवण्यें कृच्रछनिर्गमे ||

असे मूत्राची विवर्णता आणि दमा , खोकला घालवणारी औषधे  एकत्र आलेली आहेत .
वृद्ध व्यक्तींच्या न हटणाऱ्या चेंगट कासामद्धे म्हणूनच मूत्र परीक्षणात दोष आढळतात आणि वरील कल्प वापरून दुहेरी गुण येतांना दिसतो ,
आधुनिक हॉस्पिटल्स मद्धे काम केलेल्या आयुर्वेदीय वैद्यांना R T A मद्धे अनेकदा छातीला मार  लागून heamaturia  ( सरक्त मूत्र प्रवृत्ती ) होऊन रुग्ण मेलेल्याचे पहाण्यात आले असेलच .
प्राणवह / महास्रोतस आणि क्लेद , कफ , मूत्र यांचा हा आयुर्वेदीय संबंध वृक्क , हृद्रोग , श्वास , कास , बस्ती विकारात इतरत्र देखील चिकित्सेला फारच उपयोगी पडतो , त्या विषयी आधी एकदा लिहून झालेलेच आहे .
वरील पायस कल्प वरील प्रमाणे कफाचे क्लेदात रूपांतर /क्लेदाचे वर्धन आणि  मग मूत्र प्रवृत्ती वाढवून हि श्वास कमी करतांना दिसतो .

अचंबा वाटणे , धसका बसवणे , आश्चर्य वाटणे , रुग्णाच्या जवळ पास वीज पडणे अश्या गोष्टीने काहीजणाचा दमा कायमस्वरूपी जातांना दिसतो .
काहीजणांना वरील meds ने त्वचा विकार उत्पन्न होऊन दमा कमी होतांना दिसतो .
( त्यांना नन्तर 500 mg एक वेळेस पूर्ण मात्रेत समीरपन्नग हा कल्प कडुनिंब , हळद , कुटकी , कोष्ठ आणि वासा यांच्या काढ्यासह तीन महिने वापरावा .) 

छोटा जिवंत मासा गिळायला देणे , मिडऍक्सिलरी लाईनवर सुवर्णशलाकेने अग्निकर्म करणे इत्यादींचा परिणाम या प्रकारेच येतांना  दिसतो ,
वरील कल्पामधील बरीच द्रव्ये हि vasodilating अशी आहेत eg वासोसीन , सासुरीनं , इफिड्रिन त्याचाही सुरेख परिणाम या कल्पात दिसून येतो 
श्वासें yakruti प्रमाणे यकृता पासून दम्याची संप्राप्ती असल्यास दूध पिंपळी , दूध यष्टी हे संयोग यकृत पचन चांगले सुधारून ( सार्स आणि मर्स साठी या द्रव्यांचे प्राण्यावर प्रयोग झालेले आहेत ) रक्तप्रसादन करून शोणितफेन उत्तम बनवून दमा कमी करतांना दिसतात .
ऋतूनुसार द्रव्य निवड केल्यास इतर पौर्णिमांना देखील हे कल्प या विधीने वापरता येतात .
चंद्र हा औषधींचा कारक आहे हे देखील इथे महत्वाचे लक्षात घ्यायला हवे .
शरीरात 74 टक्के जल महाभूत असणे आणि जल हा कफाचा एक घटक असल्याने त्यावर येणारा भरतीचा परिणाम देखील या व्याधी /कल्पांच्या कार्यकारण भावांत लक्षात घ्यावा लागतो .
औषध देण्याच्या विशिष्ट पद्दतीत बराच कार्यकारणभाव दडला आहे .
महाश्वास , ऊर्ध्व श्वास , छिन्न श्वास ( cheyne stroks breathing ), ब्रॉकींएक्टीसिस , इम्पीझिमा , इन्टस्टीशीअल  लंग डिसीज , कार्डीयक अस्थमा या मद्धे वरील औषध प्रकार बिलकुलच उपयोगी नाही .
वरील med प्रकारासह जाणकार वैद्याने पंचकर्म आणि सोबतच्या व्याधीचा ( व्याधी संकर , उपद्रव , निदानार्थकारित्व )  eg अर्श -श्वास , हृद्रोग - श्वास , ग्रहणी - श्वास , कुष्ठ - श्वास , स्थौल्य - श्वास , वातरक्त - श्वास , अपस्मार - श्वास , मदात्यय - श्वास इत्यादी अवस्थांचा  वापर करून घेतल्यास पूर्ण गुण येण्यास मदत होताना दिसते .
रुग्णांचे ग्रुप्स घेऊन ठराविक meds वापरून याचे आधुनिक प्रकारे संशोधन देखील वैद्यांनी करायला हवे .
इतर पॅथीच्या dr ना त्यांच्या भाषेत पटवून देता येण्यासारखे यात भरपूर आहे . तरीही त्यां डॉ .नी पूर्वग्रहदूषित वृत्ती न ठेवता आयुर्वेदाची तत्वे अभ्यासून अश्या औषधी परंपराकडे पाहिल्यास जास्त चांगली समज उत्पन्न होऊ शकते .🌹🙏

... 
वैद्यराज समीर जमदग्नि सर

Comments

Popular posts from this blog

आरोग्यालय पायदान - 4 (जवानी का जोश पत्थर पचाले पर अपमान का कण नहीं)

Medicine is second option,explore today your FIRST- Trinity of wellness

लेखमाला मोती- 9