लेखमाला-मोती 2
लेखमाला-मोती 2
जमदग्नी सर
🙏🌹दोषाचा विचार नको दुष्याचा विचार नको असे रस शास्त्री म्हणत असले तरी वाताची , पित्ताची , कफाची दोन दोन दोषांची रसायनेही असतात .
ती तशी शोधून काढण्यात आयुष्य वाया घालवाव लागत,
औषधा पासून सगळं स्वतः करावं लागत ,
खूप रूग्णांवर उपचार प्रयोग होतात तेव्हा जाऊन कुठे ते औषध सिद्ध होत .
नन्तर तात्पुरते का होईना आप्तत्व अंगी बाणवून ते लोकांना सिद्धांतासह सांगाव लागत मग ते त्यांच्या कडून वापरलं जात .
आपण सांगितलेलं जर समोरचा समजू शकला तर तो वापरेल इतरांनाही सिद्धान्तासहित सांगेल , सर्व आलबेल होईल .
तस त्याला जमलं नाही तर तो आजीबाईचा बटवा होईल ./ वाटेल
मोटारकारचा शोध लावून एखाद्याने मोटार बनवली तर पुढे प्रत्येकाने इंजिनिअर बनून मग स्वतः मोटार तयार करायची नसते .
. ती शास्त्र सिद्धांत ( मोटारीचे ) समजून विकत घेऊन वापरायची असते ते सुद्धा मागे बसून .
मग चालवणारा ड्राईव्हर 10 नापास सुद्धा चालतो .
हे निर्जीव कार विषयी झालं .
एकतरी pt सेम टू सेम दुसऱ्या सारखा असतो का हो ?
तेल न लावता न शेकता सद्य वमन दिले तरी गुण येतो हि अनुभूती आणि अवस्था असते .
, तिथे शास्त्र सिद्धांताचा किस पाडला तर पांडित्य सिद्ध करता येते ,वाद हि जिंकता येतो पण व्यवहार जमेलच याची खात्री नसते .
अनेक अभ्यास हे ac रूम मद्धे शाब्दिक कोट्या करीत अनंत संदर्भ देत केले जातात ते करावेत पण !
पण या गोष्टी अत्यंत किचकट अश्या रुग्णाच्या बेड साईड ला करू लागलो कि
" सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति " इत्यादीची अनुभूती होऊन चड्डी पिवळी होते .
आणि भानावर यायला होत .
किमान 20 वर्षे प्रॅक्टिस झाल्यावर तरी हे भान येत/ यावं असा सध्याचा काल आहे .
दोधाम ,रवीवि , गुर्वादी ,दशविध priksh घटक हे महत्वाचे आहेतच पण त्यांचं महत्व वेगवेगळं अभ्यासून वापरण्यात आहे .
साधा पडश्याचा pt सुद्धा या 10 घटकांचा एकत्र विचार करून tret करून बघावा . धाबं दणाणत .
किचकट रुग्ण तर बाजूलाच राहिले .
अनेक शास्त्रीय वाद्ये एकत्र वाजवली तर बेसूर होतात पण मद्धे संगीतकार येऊन बसला कि इतक्या वाद्यातूनहि एकसुरात नादब्रह्म प्रगटते ,
आपण शारीर बौद्धिक वय वाढत जाईल तसे संगीतकार होण्याचा प्रयत्न करावा ,
वाजवताना पुन्हा संगीतातील गमभन सुरु झालं तर आपलं हास नि गाण्याचा बल्या वाजतो .
मी आयुष्यभर विद्यार्थी आहे असे वाटावे पण जरा पुढे जायलाही कुणाची हरकत नसावी .
दोष भेद आणि त्या नुसारचा रसभेद खूप अवघड असतो , तो जटिल दिसतो तेव्हा रुग्ण असाध्य असतो नि तो सोडून देण्याचा शास्त्रादेश आहे ,
नेमक्या याच ठिकाणचे काम सध्या वैद्याला करावे लागत आहे .
इतर साध्य , याप्य रुग्ण आधुनिक शास्त्र ओढून घेतेच आहे , तेव्हा काळाचा आवाज ओळखून ग्रंथकारांचे मत अजमावून त्यांच्यात पावलाने जाऊन प्रयत्न करणारे लोकांच्या पाठीवर बुक्की ऐवजी थाप पडावी ,
अतिशय हुशार वैद्यांनी दुर्धर रुग्ण चिकित्सेतून यश संपादन करून हा जगन्नाथाचा रथ ओढून काढायला हातभार लावावा .🌹🙏
जमदग्नी सर
Comments
Post a Comment