लेखमाला-मोती 1
#I_am_not_the_author
*मारवाडी बाई माझ्या गुरू**वातज ज्वर आणि घृतपान*
शिंतोडे
मी मालेगावी साने गुरुजी रुग्णालयात असतांना 94 साली मारवाडी नावाच्या परिचारिका होत्या.
खूपच हुशार. त्यांची हुशारी मला तेंव्हा कळाली जेंव्हा मी तिथे वसंतातील वमन घेत होतो. माझ्याशिवाय आणखी तीन वमनं त्यादिवशी होते.
माझं वमन लवकर आटोपून इतर वमनं करू शकेल असं ठरलं. झालं मी सर्वं तयारी नंतर कल्प घेतला आणि थोड्याच वेळात ढेपळलो. मी इतर रुग्णांचं पुढचं काहीच करण्याच्या स्थितीत नव्हतो.
मारवाडी बाईंना मी फक्त औषध तेवढं काढून दिलं. बाईंनी सर्वं वमनं सुखरूप पार पाडली. तेंव्हा माझ्या लक्षात आलं की अरे मारवाडी बाई चक्क पंचकर्म तज्ज्ञ झाल्या.
ह्याच मारवाडी बाई एकदा आजारी पडल्या. मुलाने निरोप दिला की त्यांना ताप आहे.
आम्ही दुसऱ्या दिवशी भेटायला गेलो तर बाई ठणठणीत. मी विचारलं काय झालं आणि काय केलं?
बाई म्हणाल्या माझं भयंकर अंग दुखत होतं. दवाखान्यात जरी नाही आले तरी घरचं काम चुकतं कां?
मने घनो घुस्सा आयो. घुस्सामे घर में हुतो झिको बाटकीभर घी पी लियो. मने तो आश्चर्य लाग्यो की झिकाऊ बुखार उतर ही गयो.
मला दुपारी फार राग आला नी त्या रागाच्या भरात घरात असलेलं वाटीभर तूप पिऊन टाकलं आणि काय आश्चर्य माझा ताप चक्क उतरला.
अरे बाप रे! या बाईंनी तर मला चक्क सुश्रुतोक्त अवस्था शिकवली. धन्य त्या मारवाडी बाई.
वातज ज्वराच्या पूर्वरुपावस्थेचं निदान आहे
विशेषात्तु ज्रूम्भाsत्यर्थम समीरनात् l सु. उ.39/27.
पूर्वरूपाचं महत्व काय तर
नलभते तम् उत्तरांषु गती्षु...
आणि
विरुद्ध गुण इच्छाच l
या सूत्रांनी preventive काम केलं.
त्यांना आपोआप सुचलं, आतून तीव्रतेने वाटलं की तूप पिऊनच टाकावं.
सुश्रुत म्हणतात
ज्वरस्य पूर्वरुपे्षु वर्तमाने्षु बुद्धिमान l
पाययेत् घृतम् स्वच्छम् तत: स लभते सुखम् ll सु उ 39/97.
मारवाडी बाई सुश्रुतांच्या निदाना प्रमाणे बुद्धिमान नव्हेत कां?
छे छे छे! वातज ज्वराची पूर्वरुपावस्थेत चिकित्सानुभव सांगण्यासाठी लिखाणाचे प्रयोजन मुळीच नाही. कारण तज्ज्ञ विचारतील की ज्रूम्भाधीक्य तुम्ही बघितलं कां? मग वातज ज्वर हेच निदान कसं? अपघाताने सर्व काहीं बरं झालं त्यामुळे केस स्टडी म्हणून ठीक आहे पण नियम होऊ शकत नाही.
बरोबर आहे वैद्य मित्रांनो. कारण पूर्वरूपावस्था ह्या केवळ hypothetical condition राहलेल्या आहेत. फारच थोड्या वैद्यांना ही संधी मिळते. आपण कायमच भेदावस्थेतेतीलच रुग्ण अभ्यासत असतो. पूर्वरूपात रुग्ण डाक्टर कडे यायला फी मुळे घाबरतोच. असो
मी म्हणालो तसं हा विषय आपण सोडून देऊ यात.
मला या अनुभवाचं स्मरण होण्याचं कारण आहे की आज मी कोविशिल्ड व्याक्सीनचा पहिला डोज सपत्नीक घेतला. आमची 85 वर्ष वयाची आई ते घेऊ शकेल कां हे ही कारण होतं.
अनेकांनी सांगितलं की 1-2 दिवस ताप येतो, भयंकर अंग दुखतं, दीर्घकाळ राहणारा थकवा. काहीं म्हणजे काहीच सुचत नाही. 15 दिवस घेतले मी हिम्मत बांधायला. दुपार पासून अर्चना खूपच अस्वस्थ झाली. ताप, शरीरातील बोटी बोटी, डोकं दुखू लागलं.
ताप 101 होता.
वेपथुर्विषमो वेग: कंठोष्ठ परिशोषणम्स l
निद्रानाश:क्षुत:गात्राणाम रौक्ष्यमेव च ll
शिरोहृदयगात्ररुगवैरस्यम्.... भवत्यनिलजे ज्वरे l
यातील बहुतेक लक्षणें सर्वच रुग्णांना दृग्गोचर होतात.
ठीक आहे कुणाला ही अवस्था वातज ज्वर म्हणूनही नकारायचा असेलही खचित. हरकत नाही.
पण वॅक्सीनेशन नंतर येणारा ताप आणि इतर लक्षणें म्हणजे आगंतुक ज्वर अर्थात विकतचं दुखणं नव्हे कां? हा आगंतुक मधला कुठला प्रकार अभिघातज, विषज(सु उ 39/75,76) की अन्य काहीं हा तपशीलाचा भाग असू शकतो पण सर्व आगंतुक ज्वरात वाताला प्राधान्य असतं यात कुणाचं दुमत असता कामा नये. ( सु उ 39/80)
हा आगंतुज, वातज ज्वर, निराम ज्वर होय त्यामुळे घृतपान ही चिकित्सा होऊ शकते.
बरोबर!
चरक जीर्णज्वरात सर्पिष:पानं प्रशस्यते म्हणतातच ना! ( च. नि 1/37)
बघा पटतंय कां?
मलाही 100 ताप होता. अंगमर्द, दौर्बल्य होतंच. प्यारासिटामोलादी वटी सेंटर भेटलेल्याच होत्या.
अर्चनाने रात्री जेवणानंतर एक गोळी घेतली. मी नाही घेतली. सहन करायचं ठरवलं. अर्चनाचा ताप थोडा उतरला पण वेदना, छर्दी तीला होतीच. त्यानंतर तीला पुन्हा ताप आला. थंड पाण्याच्या घड्या ठेवल्या.
तिच्यावेदनांसमोर माझ्या लक्षणांचं कौतुक निदान आज तरी चालणार नव्हतं.
मी रात्रभर बेचैन होतोच. हे काय चित्र आहे आणि त्याला उपाय काय असा प्रश्न पडलेलाच. तेंव्हा रात्री एक वाजता मला मारवाडी बाई आठवल्या. सुश्रुतांनी बोलावलं. आणि दोन वाजता मी तीस ग्राम तूप पिलं. घोटभर गरम पाणी घेतलं.आणि लिहायला बसलो. न्याहाळतोय स्वतः ला. ताप पुढील अर्धा तासातच उतरला. लिहिणं संपवताना सकाळचे चार वाजलेत. मलाच आठवत नाही की दुखणं किती वेळापूर्वी थांबलंय ते.
व्हॅक्सीन नंतर येणारा ज्वर हा वातज, आगंतुक आणि निरामय होय त्यामुळे त्यादिवशी दुपारी आणि रात्री लक्षणाची वाट न बघता 15-30 मिली घृताचा वापर सुचवायला हवं.
माझं वक्तव्य धरिष्ट्याचं वाटेल खरं!
साहसे श्री प्रतिवसति l
शास्त्रीय साहस करून मांडू यात. चिकार संधी आहे.
व्हॅक्सीन म्हणजे मिनी करोनाच की! करोनात ही अशी अवस्था या संदर्भाधारे ट्रीट करता येऊ शकते कां? हे क्षितिज त्यानंतर आपल्याला नक्की खुणावणार आहे!
वै द्य. शिवानंद तोंडे.
धन्यवाद वैद्यराज
Comments
Post a Comment