Posts

Showing posts from April, 2022

लेखमाला मोती 10

🌹🙏🏻 🍀यशस्वी आयुर्वेदिक            प्रँक्टिसची गुरुकिल्ली🍀 💫प्रत्येक वैद्याने स्वतःचे  १)सुंदर क्लिनिक  २)पंचकर्म सेटअप ३)स्वतःची फार्मसी ४)थोडीशी का होईना शेती ५)स्वतःचे आयुर्वेदीय दुकान     आणि  ६)या सर्वांचे पोषण करणारे    उत्तम ग्रंथालय,या 6 गोष्टींची    बीजे वैदयकीय व्यवसाय सुरू    करतानाच पेरायची असतात.    🍁ध्येय ठेवायला पैसे लागत       नाहीत ; ध्येयाचा पाठलाग       सुरू झाला की, 🍁अभ्यास वाढतो , 🍁 द्रव्यांचा अभ्यास होत जातो, 🍁इतरांच्या औषधांची गुणवत्ता      समजते . 🍁खर्च कमी केले जातात, 🍁बचतीचे महत्त्व कळते, 🍁गरजा कमी केल्या जातात, 🍁मिळालेले धन व्यवसायात       वापरले जाते, 🍁 दवाखान्यात बसून खुर्ची       उबवण्याचे महत्व कळते, 🍁यशस्वी लोकांच्या साधनांचा      अभ्यास घडतो, 🍁त्यांचे मोलाचे सल्ले      मिळतात, 🍁बोलण्या वागण्यातील मस्ती      कमी होवून स्वभावाला...

लेखमाला मोती- 9

🌹🙏🏻 *🔴रूग्ण तपासणी , निदान चिकित्सा व औषधीद्रव्यांची निवड🔴* 🍁रुग्ण परीक्षण हे नेहमी शरीराच्या बाहेर आत आणि औषध शोधणे हे नेहमी शरीराच्या आतून बाहेर व्हावे ,म्हणजे छान यश येते,"दर्शन स्पर्शन,प्रश्नन या मद्धे ही हाच विचार दिसतो. 🍁 पडवीच्या वर सोप्यावर बसलेले जुने वैद्य अंगणातून चालत येणाऱ्या रुग्णाच्या चाल, मुद्रा, देह बोली वरून निदान करीत असत ( स्पॉट डायग्नोसिस) त्या नंतर रुग्ण बोलू लागला की कोणता शब्द ( स्वर,व्यंजने) किती आणि कशी बोलतो यावरून कोणत्या चक्रामद्धे विकृती असावी याचा विचार करून रुग्णाचा प्रधान विकृत अवयव ही ठरवत असत( याला अनुभव आणि अभ्यासाची निरंतर जोड हवी फक्त खुर्चीत आणि ए सी त न उठता बसून राहून हे अवघड आहे,) हे जमले तर साम वेदोक्त गोष्टींचा आणि मंत्र चिकित्सेचा वापरही रुग्णावर करता येऊ शकतो. 🍁गुडघे ,सांधे, उदर ,शिर आदींची स्पर्श करून तपासणी करताना तेथील रचनेचे उष्णता मान ,रंग ,हलवून कोणत्या रचनेत विकृती आहे ,विकृत वृद्धी क्षयादी आहेत का इत्यादी गोष्टी पाहण्याने हळू हळू शरीराचे आत डोकावता येते जसे.. 🍁कंडरे मद्धे विकृती वेदना आदी आढळल्यास रक्त धातू, यकृत,ग्र...