लेखमाला मोती 7
सध्या अनेकांना भूक नसली तरी, नाष्टा कराची सवय लागली आहे ! खरतर लॉकडाऊन व संचारबंदीमुळे व्यायाम काम नाही घरी बसून ३ वेळा उदरभरण जोरात चालू आहे ! लोकांना भूक नसताना का खाता ? असे विचारले तर ▪वेळ झाली म्हणून ▪सगळ्यांबरोबर मी पण खातो ▪सवय आहे अनेक दिवसांची म्हणून ▪ताकद यायला हवी म्हणून ▪काम करायच आहे नंतर वेळ मिळणार नाही म्हणून ▪पौष्टिक नाष्टा नाही केला तर इम्युनिटी कशी मिळणार ▪औषध घ्यायची असतात म्हणून नाष्टा करतो ! अश्या अनेक कारणांची यादी आम्ही दर रोज ऐकतो ! पण मूळात "भूक लागलेलीच नसते !" अश्या सर्वांना आज न उद्या अजीर्ण होण्याची शक्यता असते. त्यातही, विशेषत: ▪कोविड व इतर व्याधींचे रुग्ण ▪ताप आलेले सर्व जण ▪भूक मंदावलेले ▪अजीर्ण होत असलेले ▪मलावष्टमभ असलेले ▪अम्लपित्त असलेले ▪आमवात असलेले ▪सकाळी उठल्यावर आळस जडपणा जकडले असलेले अश्या सर्वांनी, नाष्टा टाळावा. ह्या सर्वांची प्राथमिक चिकित्सा #लंघन अर्थात, कमी मात्रेतला हल्का पचायला सोप्पा आहार ! सध्या कोविड रुग्णांना बदाम अक्रोड पासून उकडलेल्या अंड्यापर्यंत काही ही दिले जाते ! हे अत्यंत चुकीचे आहे ! ▪विशेषत: भूक...